दिल्ली विमानतळावर पॉवर बँकचा स्फोट; प्रवासी महिेलेला अटक

0
1552

दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – दिल्लीमधील इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर पॉवर बँक जमीनीवर जोरात आदळल्याने स्फोट झाला. याप्रकरणी एका ५६ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालविका तिवारी (वय ५६, रा. डिफेन्स कॉलिनी, दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मालविका तिवारी या धर्मशाला येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. विमानतळावर पोहचल्यानंतर चेकइनच्या वेळी त्यांच्या बॅगमध्ये पॉवर बँक अढळली. सुरक्षारक्षकांनी त्यांना पॉवर बँक केबिन बॅगमध्ये ठेवण्याची विनंती केली. त्यावेळी संतपालेल्या मालविका यांनी बॅगमधील पॉवर बँक काढून ती जोरात जमिनीवर आदळी आणि पॉवर बँकचा स्फोट झाला. स्फोटाचा आवज ऐकल्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पॉवर बँकला लागलेली आग विझवून मालविका यांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर झालेला प्रकार लक्षात आल्याने जवानांनी मालिविका यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. दिल्ली पोलिसांनी मालविका यांना सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जिवीताला धोका पोहचवणे आणि  ज्वलनशील पदार्थ अयोग्य पद्धतीने हाताळणे या गुन्ह्यांखाली अटक केली आहे. कोर्टासमोर मालविका यांना हजर करण्यात आल्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.