दिल्लीत दिड महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

0
421

 

नवी दिल्ली , दि.२० (पीसीबी) – जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा वाढत चालला आहे.दिल्लीत एका दिड महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये COVID-19 ची लागण झालेल्या लहान मुलाच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे. दिल्लीत ४५ दिवसाच्या आणि १० महिन्याच्या बाळांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बालकांना सारी वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. पण कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.

दिल्ली सरकारच्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत रविवारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या २००३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ११० हे नवीन रुग्ण आहेत. तर एका दिवसात २ जणांचा मृत्यू झाला आहे.दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचे वय २५ ते ६० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक आहे. जे एकूण मृतांच्या ५६ टक्के आहे. यामध्ये १० जण ५०-५९ वयादरम्यानचे तर १० जणांचे वय ५० पेक्षी कमी होते.