दिल्लीत जाऊन त्यांना संरक्षण देऊ; पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले

0
518

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – ‘शरद पवार आम्हा पैलवानाचे आधारस्तंभ आहेत. भारत सरकारने त्यांचे संरक्षण काढून घेतले ही घटना निंदनीय आहे. शरद पवार यांचे संरक्षण जरी केंद्र सरकारने काढून घेतले तरी आम्ही दिल्लीत जाऊन त्यांच्या बंगल्याबाहेर थांबू त्यांना संरक्षण देऊ. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी दिली.

ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना कदम म्हणाले की, ‘महाराष्ट्रात कुस्ती मल्लविद्या वाढावी म्हणून पैलवानाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या शरद पवार यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो मल्ल घेतील,’ असा शब्द त्यांनी यावेळी बोलताना दिला. ‘पवारसाहेबांना सरकारी संरक्षणाची गरज नाही. शरद पवार यांना आम्ही साक्षात बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो. ते आमचे दैवत आहेत. आज त्यांना संरक्षण काढून त्यांचा जो अपमान केला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी तमाम पैलवान सरसावले आहेत. आम्ही दिल्लीत जाऊन त्यांना संरक्षण देऊ, असे ते म्हणाले.