दिल्लीतून आलेले २ जणांचे रिपोर्ट कोरोना ‘पॉझिटीव्ह’

0
544

 

पिंपरी, दि.२ (पीसीबी)- दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण आठ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते.

त्यांच्यातील अनेकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी ३० जण कोरोना बाधित असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेकजण सहभागी झाले होते. औरंगाबाद, अमरावती, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून ३३ जण सहभागी झाले होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील ३३ लोक या कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी मंगळवारी १४ तर बुधवारी ९ नागरिकांचा शोध लागला. तर, १० नागरिक शहरात राहत नसल्याचे स्पष्ट झाले. या २३ नागरिकांसह त्यांचे ५ नातेवाईक असे २८ संशयितांना महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे नमुने बुधवारी तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. त्याचे आज रिपोर्ट आले असून २८ पैकी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे हे रुग्ण कोरोनाग्रस्त झाले असून शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढला आहे.