कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय सैन्याची तयारी पुर्ण

0
650

 

मुंबई, दि.२ (पीसीबी) – भारतीय सैन्य ही कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालं आहे. याविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तयारीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल बिपीन रावत यांच्याशी संवाद साधला.

कोरोनाच्या भीतीपोटी जगातील बहुतांशी देशांमध्ये लॉकडाउन जाहिर करण्याच आलेले आहे. या जीवघेण्या रोगाचा संसर्ग थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केलेली आहे.

यावेळी बिपीन रावत यांनी सांगितले की, कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी ९ हजारपेक्षा जास्त हॉस्पिटल बेडची व्यवस्था केली आहे. ८ हजार ५०० हून अधिक डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. गरज भासल्यास सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही सुविधा उपलब्ध करु शकतो अशी माहिती दिली.