दिघीत बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

0
1034

दिघी, दि. ११ (पीसीबी) – बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (शुक्रवार) दुपारी तीनच्या सुमारास दिघीतील देहुफोटा येथे घडली.

कैलास काशिनाथ नाईक (वय २४, रा. केळगाव रोड, आळंदी देवाची) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी तीनच्या सुमारास कैलास हा त्यांच्या अॅक्टिव्हा या मोपेड दुचाकीवरुन जात होता. तो दिघी येथील देहुफाटा येथे आला असता त्याची दुचाकी आणि बसमध्ये अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मारलागून तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दिघी पोलीस तपास करत आहेत.