दिघीत डुप्लीकेट चावीने शटर उघडून ३० हजारांची रोख चोरट्यांनी केली लंपास

0
457

दिघी, दि. २९ (पीसीबी) – डुप्लीकेट चावीने दुकानाचे शटर उघडून आता प्रवेश करत कपाटात ठेवलेले रोख ३० हजारांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना दिघी परांडेनगर येथील गोकुळ कॉलनी नं.२, सुमनशिल फेज २, शॉप नं १ ते ६ मध्ये घडली.

याप्रकरणी श्रीपाद कृष्णा भावसार (वय ३७, रा. फ्लॅट नं ए/४ सुर्या टेरेस प्रतिकनगर, विश्रांतवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.२४) ते गुरुवार (दि.२५) याकालावधीत दिघी परांडेनगर येथील गोकुळ कॉलनी नं.२, सुमनशिल फेज २, येथील शॉप नं १ ते ६ हे कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी डुप्लीकेट चावीच्या सहाय्याने शटर उघडून रुम नं ३ मधील लाकडी कपाटाचे लॉक तोडले. तसेच त्यातील रोख ३० हजारांची रक्कम चोरुन नेली. दिघी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.