चाकणमध्ये मुलाला मारल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या पित्याला दगड-विटांनी जबर मारहाण

0
649

चाकण, दि. २९ (पीसीबी) – मुलाला मारल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या पित्याला दोघा भावांनी दगड आणि विटा डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.२७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चाकण येथील धामणी वस्ती बुंगीर वस्ती मध्ये घडली.

बबन कोंडीबा भोसले (वय ५०, रा. धामणे बुंगीर वस्ती, कुरवंडी, चाकण) असे जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजय कांताराम भोसले आणि विजय कांताराम भोसले (दोघे रा. धामणीवस्ती, बुंगीर वस्ती) या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी बबन भोसले यांचा मुलगा विनोद याला आरोपी अजय आणि त्याचा भाऊ विजय या दोघांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. ही बाब समजताच बबन याचा जाब विचारण्यासाठी अजय आणि विजय यांच्याकडे गेले. मात्र त्या दोघांनी बबन यांनाच शिवीगाळ करत डोक्या दगड आणि विटा फेकुन मारल्या आणि गंभीर जखमी केले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.