हेंमत करकरेंच्याविषयी साध्वी प्रज्ञासिंहचे विधान निषेधार्थ – रामदास आठवले

0
416

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – मालेगांव बॉम्बस्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात दिवंगत एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे  पर्याप्त पुरावे होते.  प्रज्ञासिंह  यांचे नाव मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे,  असे सांगून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी  साध्वींच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना आठवले म्हणाले की, हेमंत करकरे लोकांचे जीव वाचवताना आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. मी साध्वींच्या मताशी सहमत नाही. मी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. हा मुद्दा न्यायालयात आहे.  न्यायालय काय चूक आणि काय बरोबर ते सांगेल, असेही आठवले म्हणाले.

दरम्यान, माझ्या शापामुळे हेंमत करकरे यांचा मृत्यू झाला’ असे वादग्रस्त विधान करून प्रज्ञासिंह यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. या विधानानंतर साध्वींविरोधात सर्व स्तरातून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. आता  एनडीएतील घ़टक पक्षाचे नेते  रामदास आठवले यांनी  टीका केला आहे. तर भाजपने प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.