‘…आणि तरुणाला घातला दोन लाखांचा गंडा’

0
197

लोणावळा , दि. 3 (पीसीबी) : दोन मोबाईल फोन आणि एक हेडफोन विकण्याच्या बहाण्याने तरुणाकडून दोन लाख 15 हजार रुपये घेतले. मात्र तरुणाला मोबाईल फोन अथवा हेडफोन न देता त्यांची फसवणूक केली. ही घटना 14 जुलै  ते 10 ऑगस्ट या कालावधीत भारतीय नौसेना पोत लोणावळा येथे घडली.

मयूर शिरीष कोल्हे (वय 23, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्णव (7076604292) आयुष (8436460959) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून फिर्यादी यांना संपर्क केला. एक वन प्लस नाईन प्रो मोबाइल, एक आयफोन बारा प्रो मोबाइल, सॅमसंग कंपनीचा हेडफोन ऑनलाइन विकण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर दोन लाख 15 हजार 300 रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना मोबाईल फोन आणि हेडफोन न पाठवता त्यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.