दारू पिण्यासाठी पैसे नव्हते म्हणून चोरला टेम्पो

0
742

हिंजवडी, दि.१८ (पीसीबी) – एका बेवड्याने दारू पिण्यासाठी पैसे नव्हते म्हणून पीक अप टेम्पो चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीक अप टेम्पो सह हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

कालिदास प्रकाश केदारी असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कालिदास प्रकाश केदारी याला दारूचे व्यसन आहे. त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने त्याने हिंजवडी परिसरातून पीक अप टेम्पो चोरल्याचे सांगितले. कालिदास हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाकड आणि तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हिंजवडी पोलिस भूमकर चौक वाकड येथे गुंड स्कॉड कारवाई करीत असताना  त्यावेळी एक पीक अप टेम्पो भूमकर चौकाकडे येत असल्याचे दिसले. पोलिसांनी पीक अपला अडवून तपासणी केली असता ती पीक अप टेम्पो चोरीचा असल्याचे दिसले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून पीक अप टेम्पो चोरल्याची कबुली आरोपी ने दिली. 

याप्रकरणाची कारवाई, संदिप बिष्णोई( पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड), रामनाथ पोकळे (अप्पर पोलिस आयुक्त),  सुधिर हिरेमठ (पोलिस उप-आयुक्त), विनायक ढाकणे (पोलिस उप-आयुक्त), श्रीकांत मोहीते (सहाय्यक पोलीस आयुक्त) वाकड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरीक्षक यशवंत गवारी,  अजय जोगदंड (पोलिस निरीक्षक), अनिरूध्द गिझे (पोलिस उप- निरीक्षक), महेश वायबसे ( पोलिस उप-निरीक्षक), बाळकृष्ण शिंदे (पोलिस हेडकोन्स्टेबल), किरण पवार (पोलिस हेडकोन्स्टेबल), अतिक शेख (पोलिस नाईक), कुनाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, ओ.कॉ.सुभाष गुरव, झनकसिंग गुमलाडु, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, पो.कॉ.पालवे या पथकाने केली.