दापोडीत वाईन्स शॉपची तोडफोड करुन कामगारांना मारहाण

0
1579

दापोडी, दि. १९ (पीसीबी) – सात जणांच्या टोळक्यांनी वाईन्स शॉपची तोडफोड करुन तेथील कामगारांना जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि.१८) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास दापोडीतील लकी वाईन्स या दुकानात घडली.

याप्रकरणी सचिन किसन गोरे (वय ३८, रा. घर क्र. ५४, साई निवास सोसायटी, उंड्री) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गोटु किंगरे, सुशांत (पूर्ण नाव आणि पत्ता समजूशकले नाही) आणि त्यांचे चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आरोपी गोटु किंगरे, सुशांत आणि त्यांचे चार ते पाच साथीदार फिर्यादी यांचे दापोडीतील लकी वाईन्स या दुकानात शिरले त्यांनी दुकानातील चार हजार रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्यांची तोडफोड करुन दुकानातील कामगार बबन आष्टे, इंद्रजित सोनवणे, बालाजी सुर्यवंशी आणि प्रमोद कोल्हे यांना जबरमारहाण केली आणि पसार झाले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पी.आर.कठोरे तपास करत आहेत.