दिवाकर रावतेंना विधानभवनात रोखून विद्या चव्हाणांनी विचारला जाब  

0
1483

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज (सोमवार) विरोध, घोषणाबाजी आणि गोंधळ या वातावरणात सुरूवात  झाली. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना  विधानभवनात प्रवेश करताना रोखले. यावेळी त्यांनी रावतेंना  ओला-उबर संपाबाबात जाब विचारला.

दरम्यान, सरकारने १३ मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ओला, उबर चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे. या संपाविषयी आमदार विद्या चव्हाण यांनी रावतेंना धारेवर धरले. या संपामुळे सर्वसामान्यांना नव्हे, तर आमदारांना त्रास झाल्याचे चव्हाण यांनी रावतेच्या निदर्शनाला आणून दिले.

यावर रावतेंनी संतप्त चेहऱ्यांनी कोण ओला-उबर? कोणी दिली त्यांना परवानगी असा उलट प्रश्न केला. तसेच दळणवळणासाठी लोकल, बस, मेट्रोचे असे इतर पर्याय आहेत, असेही दिवाकर रावते म्हणाले. हा वाद न्यायालयातील आहे. त्यामुळे मी काय करु, असे म्हणत त्यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान,  मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे ३० हजार ओला, उबर टॅक्सीचालक-मालक आजपासून पुन्हा संपावर गेले आहेत.