भीमा कोरेगाव प्रकरण; काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांची पुणे पोलीस चौकशी करणार

0
748

पुणे, दि. १९ (पीसीबी) – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी संबंधित काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुणे पोलीसकडून  दिग्विजय सिंह यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.   

पुणे पोलिसांनी या प्रकरणी हायप्रोफाइल कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्या एका पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाइल क्रमांक  आढळून आला आहे. सीपीआयएमच्या एका कार्यकर्त्याकडे हे पत्र  होते. ते पत्र जप्त केल्याचा दावा पुणे पोलिसांनी  केला आहे. २५ सप्टेंबर २०१७ रोजी हे पत्र लिहिलेले आहे. या पत्रात ‘कॉम्रेड प्रकाश’ने विद्यार्थ्यांचा वापर करत राष्ट्रीय स्तरावर विरोध करण्यासाठी काँग्रेस नेता त्यांची मदत करण्यास तयार असल्याचे ‘कॉम्रेड सुरेंद्र’यांना म्हटले होते. या पत्रात एक फोन नंबरही लिहिला असून तो काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा असल्याचा दावा केला जात  आहे.

पुणे पोलिसांच्या मते, कॉम्रेड सुरेंद्र म्हणजे सुरेंद्र गडलिंग यांच्याशी संदर्भात आहे. जे नागपूरमध्ये वकिली करतात. त्यांना जूनमध्ये पोलिसांनी अटक केली होती. तर कॉम्रेड प्रकाश हे सीपीआयएमच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.पुणे पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून न्यायालयात पत्र सादर केल्यानंतर त्यातील मजकूर सार्वजनिक झाला होता.