दापोडीत कौटुंबिक वादातून दोन गटात कोयता आणि तलवारीने तुंबळ हाणामारी

0
2292

दापोडी, दि. २ (पीसीबी) – दोन कुटूंबातील वादामुळे, दोन गटात झालेल्या जबर हाणामारीत दोन्हीकडच्या लोकांवर कोयता आणि तलवारीने वार झाल्याचे समोर आले आहे. ही घटना दापोडी येथे गुरुवारी (दि.१) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्हीकडच्या पक्षकारांनी परस्पर विरोधीत तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार, दोन्हीकडच्या पक्षकारांमधील बा उर्फ फिरोज दिलावर शेख (वय ३६) आणि त्यांचे पाच अनोळखी साथीदार तसेच अजय मोरे, विजय, सागर वाल्मिके, दिपक वाल्मिके आणि इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि वाल्मिके कुटूंबात वाद आहेत. या वादातूनच गुरुवारी दुपारी बा उर्फ फिरोज शेख आणि त्यांचे पाच अनोळखी साथीदारांनी मीळून सागर वाल्मिके याच्यावर कोयता आणि तलवारीने जबर वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी सागर याच्या आत्याच्या घरात घुसून त्याच्या आत्याला, त्यांचे पती आणि आजीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि पसार झाले. यानंतर काही वेळाने अजय मोरे, विजय, सागर वाल्मिके, दिपक वाल्मिके आणि इतर तीन जणांनी मिळून जय भिसे याच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. तसेच फिरोज शेख याच्या घरात घुसून त्याची पत्नी, आई जुबेदा शेख यांना मारहाण करुन घरातील वस्तूंची तोडफोड केली. याप्रकरणी दोन्हीकडच्या पक्षकारांनी भोसरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधीत तक्रार दाखल केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे तपास करत आहेत.