दाऊद भारतात येण्यास तयार होता, पण शरद पवारांनी दुर्लक्ष केले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

0
458

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन  दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता.  याबाबतचा प्रस्ताव ज्येष्ठ वकील  राम जेठमलानी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री  शरद पवार यांच्याकडे दिला होता.  मात्र पवार यांनी या प्रस्तावकडे दुर्लक्ष केले, असा सनसनाटी आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज (मंगळवार) येथे केला आहे.

मुंबईत आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत   प्रकाश आंबेडकर बोलत होते. आंबेडकर यावेळी म्हणाले की,  मी राज्यसभेत खासदार होतो, त्यावेळी राम जेठमलानी देखील खासदार होते, आम्ही दोघे मित्र होतो.  त्यांनीच मला ही माहिती पहिल्यांला दिली.

दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता. हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला होता. शरद पवार यांनी खुलासा करावा की त्यांनी ही माहिती पंतप्रधानांना दिली होती का? त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला का? आणि घेतला तर असा निर्णय घेणारे पवार कोण?, असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.

दाऊद स्वत:हून यायला तयार होता. त्याला कोणत्या अटींवर आणता आले असते, हे केंद्र सरकार पंतप्रधान यांच्या खात्यातील निर्णय आहे. पवार तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पवारांनी ही माहिती स्वतःकडे ठेवली का? , असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.  हा प्रस्ताव दिला हे मला नेटवरुन कळले. हा प्रस्ताव  १९९३ ला दिला होता, असेही त्यांनी सांगितले.