तळवडे येथे कारची तोडफोड करुन एकावर कोयत्याने वार

0
492

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – कारने मित्राला घरी सोडायला निघालेल्या तिघांवर अन्य तिघाजणांनी दगडफेक करुन कारचे नुकसान केले तसेच मारहाण करुन एकावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि.१७) रात्री साडेआठच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथील सप्तऋंगी हौसिंग सोसायटीजवळ घडली.

सागर शंकर चव्हाण (वय ३०, रा. विकास हौसिंग सोसायटी, रुपीनगर तळवडे) असे कोयत्याचा वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचे दोन मित्र शुभम सरोदे आणि अनिकेत गोडसे हे किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. त्यानुसार, शरद भालेकर (रा. सप्तऋंगी हौसिंग सोसायटी), योगेश भुजबळ आणि लक्ष्मण भालेकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सागर आणि अनिकेत हे दोघे कारने त्यांचा मित्र शुभम याला त्याच्या घरी सोडण्यासाठी निघाले होते. यावेळी आरोपी शरद, योगेश आणि लक्ष्मण या तिघांनी सागर यांच्या कारवर हल्ला चडवून दगड आणि कोयत्याने कारची तोडफोड केली. तसेच सागर याच्या खांद्यावर कोयत्याने वार करुन मित्र शुभम आणि अनिकेत या दोघांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.