राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

0
404

मुंबई,दि. १९ (पीसीबी) – पुत्र  सुजय विखे पाटील यांच्या   भाजप प्रवेशामुळे कोंडी झालेले काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर  पक्षश्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.  सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.  

मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी देखील आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार नसल्याचे  विखे पाटील यांनी  म्हटले होते. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू, असेही विखे म्हणाले होते. पुत्र सुजय यांनी आपल्याला न सांगताच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असे विखे  यांनी सांगितले.

दरम्यान, सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पक्षांकडून  कारवाई होणार का? किंवा नैतिक जबाबदारी म्हणून राधाकृष्ण स्वत: राजीनामा देणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात  सुरू झाली होती. विखेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा   स्वत:च दिला की पक्षाने राजीनामा देण्यास सांगितले, याबाबत काहीही स्पष्ट समजू शकलेले  नाही.