दया न दाखवता मारुन टाका; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल  

0
1370

बंगळुरु, दि. २५ (पीसीबी) –  कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जेडीएस (जनता दल सेक्युलर) पक्षातील एका नेत्याची सोमवारी (दि.२४) हत्या  करण्यात आली. त्यानंतर  कुमारस्वामी यांनी  फोनवरून  हल्लेखोराला कोणतीही दया न दाखवता मारुन टाका, अशा सुचना दिल्या.  कुमारस्वामी फोनवर बोलत असातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे कुमारस्वामी  अडचणीत येण्याची शक्यता आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुमारस्वामी फोनवर कोणाला तरी सांगत आहेत की,  मारताना कोणत्याही गोष्टीची तमा बाळगू नका. परंतु यानंतर  या प्रकाराचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर कुमारस्वामी यांनी मी असा कोणताही आदेश दिलेला नाही, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

कर्नाटकमधील जेडीएसचे नेते नेते प्रकाश (वय ५०) यांची हत्या करण्यात आली. प्रकाश हे त्यांच्या कारने मद्दूरला जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. चार दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या प्रकाश यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.