थरारक अपघात: बसच्या खिडकीतून डोक काढून उलटी करणाऱ्या महिलेचे मुंडके धडापासून झाले वेगळे

0
3849

भोपाळ, दि. २१ (पीसीबी) – मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातल्या डायमंड क्रॉसिंगजवळ एक विचित्र अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे. भरधाव बसमधील एका महिला खिडकी बाहेर डोक काडून उलटी करत असताना तीच डोक रस्त्यावरच्या खांबाला धडकल्याने महिलेचे मुंडक धडापासून वेगळ झाल. हा आघात इतका भयंकर होता की त्या महिलेचे मुंडकेच रस्त्यावर पडले आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

आशा राणी (वय ५५, रा. छत्तापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा या सटाणा जिल्ह्यातून पाटणा जिल्ह्यात प्रवास करत होती. यावेळी बसचालक अगदी वेडीवाकडी वळणे घेत भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे मळमळल्यासारखे झाल्याने आशा यांनी उलटी करण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढले. मात्र त्यांचे डोके रस्त्याच्याकडेला असणाऱ्या पथदिव्याच्या खांबाला आदळले. हा आघात इतका जोरदार होता की या महिलेचे शीर धडापासून वेगळे होऊन रस्त्यावर पडले.  पोलिसांनी याप्रकरणी बस चालकाला अटक केली आहे. तर शवविच्छेदनानंतर आशा यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.