फर्ग्युसन महाविद्यालयात बी.जी. कोळसे पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी   

0
911

पुणे, दि. २१ (पीसीबी) – माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्याविरोधात  फर्ग्युसन महाविद्यालयात  अभाविपच्या विद्यार्थ्यांनी  आज (सोमवार) जोरदार घोषणाबाजी केली. कोळसे-पाटील मुर्दाबादच्या घोषणा यावेळी दिल्या. तर  प्रत्युत्तरादाखल  विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाने कोळसे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

विरोध करणाऱ्या गटाने फर्ग्युसनच्या कँपसमधील रस्त्यांवर ‘कोळसे पाटील गो बॅक’, ‘राज्यघटनेची पायमल्ली करणारे राज्यघटनेवर काय बोलणार’ अशाप्रकारचे अनेक संदेश लिहून विरोध दर्शवला. एकीकडे विरोध सुरू असतानाही कोळसे-पाटील यांनी इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते महाविद्यालयातून बाहेर पडले.

फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटर मध्ये  बी.जी.कोळसे पाटील यांचे ‘भारतीय राज्यघटना’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. परंतु शनिवारी अचानक या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आणि महाविद्यालयात तणाव निर्माण झाला. संस्थेने परवानगी नाकारल्यावरही व्याख्यान घेण्यावर विद्यार्थ्यांचा एक गट ठाम होता. तर अभाविपने कोळसे-पाटील यांना विरोध दर्शवला होता.