देहुरोडमधील कत्तल खाण्यावर धाड; चार जिवंत जणावरांसह बाराशे किलो गोमांस जप्त

0
601

देहुरोड, दि. २१ (पीसीबी) – गायींची अवैधरित्या कत्तल करणाऱ्या एका कत्तल खाण्यावर गोरक्षकांच्या मदतीने धाड टाकून देहुरोड पोलिसांनी चार जिवंत जणावरांसह तब्बल बाराशे किलो गोमांस जप्त केले आहे. ही कारवाई पहाटेच्या सुमारास देहूरोड येथील शितळानगर परिसरात एका पत्र्याच्या घरामध्ये करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सचिन साहेबराव शित्रे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, देहुरोड पोलिसांना गोरक्षकांनी माहिती दिली होती कि, देहूरोड येथील शितळानगर परिसरातील एका पत्र्याच्या घरामध्ये गायींची कत्तल करुन मास विकले जात आहे. यावर देहुरोड पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून चार जणावरांची सुटका केली. तर तब्बल बाराशे किलो गोमांस जप्त केले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.