तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी के. चंद्रशेखर राव दुसऱ्यांदा विराजमान

0
743

हैदराबाद, दि. १३ (पीसीबी) – तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी आज (गुरूवार) दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेलंगण राज्याच्या स्थापनेनंतर राव यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. राज भवनमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली.

राव यांनी सहा महिन्यांपूर्वीच तेलंगण विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसमवेत विधानसभा निवडणुका झाल्यास राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरून  राज्यात फटका बसण्याची भीती राव यांना वाटत होती. त्यामुळे मुदतीपूर्वीच  विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय राव यांना अनुकूल ठरला. विधानसभा निवडणुकीत तेलंगण राष्ट्र समितीने घवघवीत यश संपादन केले.

तेलंगणमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्ता कायम ठेवणाऱ्या तेलंगण राष्ट्र समितीच्या खात्यात राज्यातील एकूण मतांपैकी ४६.९ टक्के मते पडली. राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसने राज्यात ८८ जागांवर विजय मिळवला आहे.