वारसा रक्तात असावा लागतो; पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला   

0
1029

बीड, दि. १३ (पीसीबी) – नुसते भाषण आणि अभिनय करून वारसा  चालून येत नाही. तर तो रक्तात असावा लागतो, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला.  

बीड जिल्ह्यात गोपीनाथगड येथे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत दोन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. याप्रसंगी  पंकजा मुंडे बोलत होत्या.

पंकजा म्हणाल्या की, देशातील पाच राज्यातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. काही जण या राज्यातील निकालावर मोठमोठी विधाने करत आहेत. त्यांचा पक्ष राज्याच्या बाहेर कोणाला माहीत तरी आहे का, असा  उपरोधिक सवाल त्यांनी यावेळी केला.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी तिघी बहिणींना कोणत्याही परिस्थितीशी धैर्याने लढण्याचे संस्कार दिले.  मागील चार वर्षांत आपण मुंडेंचा राजकीय व सामाजिक वारसा चालवण्याचा प्रयत्न आपल्या परीने करत असल्याचे त्या म्हणाल्या.