‘तू व्हर्जिन आहेस का’? चाहत्याचा टायगरला प्रश्न

0
843

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या चित्रपटांपेक्षा अभिनेत्री दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. दोघांमध्ये सारे काही अलबेल नसल्याचे कधी म्हटले जाते तर, कधी दोघंही एकमेकांसोबत डिनर करतना दिसतात. या दोघांच्या चर्चा सुरुच असतात.दिशासोबतच्या चर्चेवरून टायगर नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत असतो. त्यातच एका युजरने टायगरला नको तो प्रश्न विचारला. या प्रश्नाला टायगरने त्याच्या पद्धतीने मजेशीर उत्तर दिले.

टायगरने इन्स्टाग्रावर ‘आस्क मी एनिथिंग…असे विचारल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. अनेकांनी खासगी प्रश्न विचारून त्याची चांगली गोची केली. एका चाहत्याने तर, थेट ‘तू व्हर्जिन आहेस का’ असा प्रश्न विचारला. यावर टायगनंही त्याला ‘अरे बेशरम! माझे आई-वडिलही मला फॉलो करतात’ असे उत्तर दिले.

इतकच नाही तर, ‘तू दिशा पटानीला खरंच डेट करतोस का?’ या प्रश्नावर टायगरने उत्तर दिले, ‘मी तिच्या योग्यतेचा नाही’. हे सांगताना, मूळ प्रश्नाला उत्तर देणे मात्र त्याने चातुर्याने टाळलेच.