तुमच फेसबुक अकाऊंट आपोआप लॉग आऊट झालंय का?, तर तुमच अकाऊंट हॅक झालंय

0
414

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – फेसबुकची तब्बल ५ कोटी अकाऊंट हॅक झाली आहेत. हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये भारतीय अकाऊंटचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. फेसबुकच्या View as या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा गैरफायदा घेत हॅकर्सने फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती खुद्द कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव फेसबुककडून केल्या गेलेल्या उपाययोजनेअंतर्गत आणखी चार कोटी फेसबुक अकाऊंट प्रभावित झाल्याचेही झुकेरबर्ग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हॅक झालेली पाच कोटी खाती नेमकी कोणत्या देशातील असल्याचे मात्र फेसबुककडून जाहीर करण्यात आलेले नाही.