तुमच्या सगळ्या शाळा माहीत आहेत; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

0
698

कोल्हापूर, दि. १५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर साखर कारखानदार व खासदार संघटनेचे मॅच फिक्सिंग  सुरू आहे. तुमच्या सगळ्या शाळा माहीत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करायचे सोडून द्या,  असा टोला राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.   

एका कार्यक्रमात बोलताना खोत यांनी शेट्टी यांच्यावर तोफ डागली. राजू शेट्टी यांनी एफआरपीच्या थकबाकीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच खोत यांच्यावरही टीका केली होती. या टीकेला खोत यांनी  यावेळी प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासहित देण्यास भाग पाडू, शेतकऱ्यांनी त्याची चिंता करू नये, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

खोत पुढे म्हणाले की जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर घसरले आहेत. मात्र,  केंद्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे रक्कम देण्यास मोठी मदत केली आहे.  तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकांच्या  तोंडावर  काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी शेट्टी यांच्यावर केला.