पुण्यातील वाहतुक नियमन आता रोबोट करणार…

0
864

पुणे, दि. १५ (पीसीबी) – एसपी रोबोटिक्स या शिक्षण संस्थेमधील सहावी ते नववीच्या सहा मुलांनी चक्क वाहतुक नियमन करणारा रोबोट तयार केला आहे. या राबोटचे प्रात्याक्षिक आज (मंगळवार) पुणे पोलीस आयुक्तलयात करण्यात आले.

गेल्या दोन महिन्यांपासून या रोबोटवर काम करण्यात येत होते. या रोबोट वाहनचालकांना थांबण्याची आणि जाण्याची सुचना करतो. तसेच तो प्रत्येक कोणात वळू शकतो. सध्या हा रोबोट प्राथमिक अवस्थेत असून काळानुरुप यात बरेच संशोधन करण्यात येणार आहे. त्यानंतर हा रोबोट वाहतूक पोलिसांच्या मदतीस येणार आहे. या रोबोटमुळे वाहतूक नियमन करने सोपे होणार आहे.