तीन महिन्याचे एकदम मिळणारे धान्य हे आता दरमहा मिळणार

0
557

 

मुंबई, दि.२ (पीसीबी) – सुरवातीला ३० मार्च रोजी राज्य सरकारने तीन महिन्याचे धान्य हे एकाच वेळी देणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र आता यामध्ये सरकारकडून बदल करण्यात आला आहे. तांदूळ, गहू आणि डाळ हे मोफत देण्यात येणारे धान्य आता दर महिन्याला देण्यात येणार आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

जे धान्य आधी एकाच वेळी तीन महिन्याचे देण्यात येणार होते. त्यात आता बदल करून हे धान्य दरमहा मिळणार आहे. यामध्ये तांदूळ, गहू आणि डाळ देण्यात येणार आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी अन्नधान्य पुरवठ्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

राज्य सरकारने थाळी पाच रुपयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली, मिरज शहरात पाच ठिकाणी योजनेचे केंद्रे सुरु होती. त्यात कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी, कडेगाव, पलूस, जत, वाळवा व शिराळा या तालुक्‍यांचा समावेश आहे. येथील प्रत्येक केंद्रावर दीडशे थाळ्यांची सोय करण्यात आलेली आहे. गरजेनुसार केंद्रे वाढवण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. या केंद्राची सुधारीत वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत ठेवलेली आहे.