तिहार कारागृह सुरक्षित; विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा?  

0
668

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – ब्रिटनच्या एका न्यायालयाने तिहार कारागृह सुरक्षित असल्याचा निर्णय मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाच्या खटल्यात दिला आहे. त्यामुळे हा निर्णय भारतातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून गेलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी महत्वाचा ठरु शकतो. तसेच भारतातून फरार झालेल्यांना भारत प्रत्यार्पण होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.