ताजमहालचा सांभाळ करता येत नसेल तर ताजमहालला टाळे ठोकण्यात येईल- सर्वोच न्यायालय

0
479

दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – ताजमहालचा सांभाळ करता येत नसेल तर आम्ही ताजमहालला टाळे ठोकू किंवा तुम्ही तो उद्ध्वस्त करा, अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला कानपिचक्या दिल्या आहेत.
न्या. दीपक आणि न्या. मदन लोकुर यांच्या खंडपीठाने घेतलेल्या या सुनावणीत. ‘ताजमहालचे संवर्धन करण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही. त्याचे संवर्धन व्हायला हवे. नाहीतर आम्ही त्याला टाळे ठोकू किंवा तुम्ही तो उद्ध्वस्त करा किंवा त्याचे संवर्धन करा,’ असे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे.