तळेगावात चॉपर, सत्तुर आणि सुरा जवळ बाळगल्याने दोघांना अटक

0
663

तळेगाव, दि. १८ (पीसीबी) – चॉपर, सत्तुर आणि सुरा या सारखे घातक हत्यार जवळ बाळगणाऱ्या दोन तरुणांना हत्यारांसह अटक करण्यात आली. ही कारवाई तळेगाव दाभाडे पोलिसांनी रविवारी (दि.१७) सायंकाळी चारच्या सुमारास सोमाटणे टोलनाक्याच्या पुढे भजनसिंग हॉटेल समोर घडली.

प्रथमेश दिलीप मराठे (वय २१, रा. रुम नं. ३१/बी प्रेरणा कॉ. हौसिंग सोसायटी, मस्करनेस कॉलनी, तळेगाव) आणि अविष्कार वाघोजी भेगडे (वय २१, रा. गणपती चौक, भुजबळ हॉलसमोर तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

रविवारी तळेगाव दाभाडे पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, प्रथमेश आणि अविष्कार या दोन तरुणांकडे घातक हत्यारे असून हे दोघे सोमाटणे टोलनाक्याच्या पुढे भजनसिंग हॉटेल समोर उभे आहेत. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून प्रथमेश आणि अविष्कार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता या दोघांकडून चॉपर आणि सत्तुर जप्त करण्यात आले. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.