…तर हर्षवर्धन पाटील राजकीय संन्यास घेणार का ?– आमदार दत्तात्रय भरणे

0
849

पुणे, दि. ८ (पीसीबी) – काँग्रेस नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे कालवा सल्लागार समितीचे सदस्य नसतील, तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, ते सदस्य असतील, तर ते राजकीय संन्यास घेणार का ? असे प्रत्युत्तर इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिले आहे.  

पाण्याच्या प्रश्नावरून  हर्षवर्धन पाटील यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व भरणे यांनी निशाणा साधला होता. यावर पाटील यांनी उत्तर देताना पाणी आणता येत नसेल, तर खुर्ची खाली करा, असे म्हटले होते. त्याचबरोबर  आपण कालवा सल्लागार समितीचे सदस्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

यानंतर भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील कालवा सल्लागार समितीचे सदस्य असल्याचे   पत्र दिले आहे. पाटील हे सध्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पुण्याच्या पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी २८ सप्टेंबर रोजी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षांना लेखी पत्र पाठवून खरीप हंगामाचे पिण्याचे व सिंचनासाठीचे पाणी वापराचे नियोजनासाठी बैठकीला चार ऑक्‍टोबर रोजी उपस्थित राहण्याची विनंती केली होती. सदरच्या पत्रावर कारखान्याने पोचही दिली आहे.