बहिणीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाने स्वत:वर झाडली गोळी

0
737

दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – मोबाईल फोन फुटल्याने बहिणीसोबत झालेल्या जोराच्या भांडणाच्या रागातून एका १७ वर्षीय तरुणाने स्वत: वर गावठी कट्टयाने गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.७) सकाळच्या सुमारास दिल्लीच्या बिंदापूरमधील मातीआला भागात घडली.

गुलशन शेरावत (वय १७, रा. बिंदापूर, मातीआला, दिल्ली) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंदापूरभागातील आकाश हॉस्पिटलकडून रविवारी सकाळी सहाच्या सुमारास गोळी लागल्याने गुलशन हा गंभीररित्या जखमी झाला आहे असे पोलिसांना सांगण्यात आले. गुलशनला रुग्णालयात आणले त्यावेळी मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु होता असे डॉक्टरांनी सांगितले. गुलशनने अत्यंत जवळून ही गोळी झाडली. त्याच्या पॉकेटमध्ये पोलिसांना आणखी चार जिवंत काडतूस सापडली. गुलशनच्या हातून बहिणीचा मोबाइल फोन तुटला. त्यावरुन त्याचे आणि बहिणीचे जोरदार भांडण झाले होते. या वादावादीनंतर शनिवारी रात्री रागाच्या भरात तो घरातून निघून गेला. रविवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्याने बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेतली असे रणबीर शेरावत यांनी पोलिसांना सांगितले. दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहेत.