डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सरसंघचालकांचे विचार एकसारखे – चंद्रकांत पाटील

0
377

नागपूर, दि. २५ (पीसीबी) – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले जावे, पण ठराविक कालावधीनंतर आरक्षणाचा आढावा  घेण्यात यावा, असे मत व्यक्त केले होते.  सरसंघचालकांनीसुद्धा तशीच भूमिका मांडली आहे. आरक्षण रद्द करा, असे सरसंघचालक बोललेच नाहीत,  असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

नागपूरमध्ये  चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असा पुनरुच्चार केला आहे.  विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. आम्हाला जर गडगडच करायची असती तर आम्ही बारामतीत केली असती आणि ती ही जागा जिंकली असती, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.

बॅलेट पेपरवर जरी निवडणूक घेतली तरीदेखील भाजपला कसलाच फरक पडणार नाही. आम्ही २२० जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  तसेच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत  दोन्ही पक्षांची गणेशोत्सवात बैठक होईल, असेही त्यांनी सांगितले.