माजी अर्थमंत्री अरुण जेटली अनंतात विलीन

0
364

दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज (रविवार) दुपारी दिल्लीतल्या निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा रोहन जेटली यांनी मुखाग्नी दिला.

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

त्याआधी भाजपा मुख्यालयात अरुण जेटली यांचं भाजपा आणि इतर राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

९ ऑगस्टला अरूण जेटली यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे काल (शनिवार) सकाळी निधन झाले. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अरूण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, ६ ऑगस्टला माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यानंतर जेटली यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे.