डॉक्टरांकडे खरोखरच डिग्री आहे की नाही सर्व डॉक्टर हॉस्पिटलची चौकशी व्हावी – सतोष वाळके

0
686
पिंपरी, दि.३ (पीसीबी) – बोगस डॉक्टरांकडे खरोखरच डिग्री आहे की नाही सर्व डॉक्टर हॉस्पिटलची चौकशी व्हावी ह्याची विनंती सतोष बबनराव वाळके यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून केले आहे.
सतोष वाळके यांनी अर्जात असे म्हटले आहे की पिंपरी चिंचवड शहरात बोगस डॉक्टर सुळसुळाट झाला असून साधा बी एच एम एस डॉकटर राजरोस पणे हॉस्पिटल बांधून बाहेरचे एम डी, स्किन, कान, नाक, हाडांचे, सायट्रिक डॉकटर बोलावून त्यांना पॅनल वर ठेवून लोकांची फसवणूक केली जाते पेशंट हॉस्पिटलमध्ये आला की त्याला हाय पावर पेन किलर गोळ्या देवून पुन्हा त्रास झाल्यास दाखवायला या असे सांगून ठेवतो. पेशंट पुन्हा येतो मग त्याचे  रक्त लघवी तपासणी लॅब पाठवली जाते. मग पुढे लॅब वाले यांचे संगनमताने काय रिपोर्ट तयार करायचा हे ठरवले जाते. हे सर्व ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पध्दतीने तयार केले जातात तेथून पुढे ह्याच डॉकटर ने पॅनल वर ठेवलेल्या डॉकटर कडे ट्रीटमेंट सुरू होते. मग मेडिकल स्टोअर्स प्रवास सुरू होतो. मेडिकल,लॅब, पॅनल डॉकटर यांचेकडून डी एम एच एस/बी एम एच एस डॉकटर ज्याचे हॉस्पिटल असते, त्याला कमीशन सुरू होते फक्त पेशंट ओळख आणि काही सांगितले तरी पेशंटची विश्वासाहर्ता जपल्याचे नाटक असते. त्यामुळे साधे शिकवू डॉकटर पण मोठे हॉस्पिटल बांधतो .विशेष म्हणजे त्याने लिहून दिलेली गोळी दुसऱ्या मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळणार नाही. कारण मोठ्या प्रमाणात मेडीसिन कंपनी यांना फॉरेन फॅमिली  ट्रीप अरेंज करून देते. म्हणून हे यांच्या जवळच्या मेडिकल स्टोअर्स मधून औषधे घ्यायला लावतात. या सगळ्यामध्ये पेशंट बाबत काही झाले की मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करणे साठी पाठवतात अंगाशी प्रकरण येवू लागले की सेटलमेंट राजकीय नेते पकडून करायचे असे सर्व धंदे मांडले आहे. या सर्व बाबी विचारात घेतले तर डॉकटर विरूद्ध कायदे एवढे एक तर्फी केले आहे की सामान्य माणूस कोठेही गेला दाद दिली जात नाही. गेलाच वर पर्यंत तर   डॉकटर  डॉकटर एकमेकांना वाचविण्याचे काम करतात. त्यामुळे सामान्य माणूस आजार घेवून गप्प पडतो हे सर्व प्रकार शहरात सुरू आहे आणि विशेष म्हणजे महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाचे,ससून,औंध युरो रुग्णालय यांचे अधिकारी यांचे महिना आर्थिक वजन ठेवून परवानगी देण्यात येते तसेच या अधिकारी मंडळींना महिना पॅकेज दिले जाते त्यामुळे अनधिकृत बांधकाम असताना सुध्दा हॉस्पिटल परवानगी देण्यात येते. हे सर्व प्रकार शहरात सुरू असून लोकांच्या जीवाशी खेळ करणारे  बोगस डॉकटर तसेच काही डॉकटर खरोखर डिग्री आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व डॉकटर हॉस्पिटलची तपासणी चौकशी सुरू करण्यात यावी. वाळके यांनी अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.