डीएसकेंचा पाठ अभ्यासक्रमातून वगळण्याचे पुणे विद्यापीठाचे आदेश

0
795

पुणे, दि. ३ (पीसीबी) – बीकॉमच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमातून बांधकाम व्यावसायिक  डी एस कुलकर्णी यांच्यावरील पाठ वगळण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला आहे. याबाबत विद्यापीठाने परिपत्रकच प्रसिध्द केले आहे. त्याचबरोबर बीकॉमच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमातून डॉ. प्र.चि.शेजवलकर यांचाही लेख वगळण्याचा आदेश  दिला आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना १७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सध्या ते येरवडा कारागृहात  आहेत. त्यामुळे विद्यापीठाने त्यांचा पाठ अभ्यासक्रमातून वगळण्याचा आदेश दिला आहे.

टीवायबीकॉम अभ्यासक्रमातील बिझनेस इन्टरप्रिन्युअरशिप स्पेशल पेपर २ च्या बिझनेस इन्टरप्रिन्युअरशिप कोर्स कोड- ३०  या विषयातील प्रथम सत्रातील ‘द स्टडी ऑफ ऑटोबायोग्राफिक ऑफ फॉलोईंग इन्टरप्रिन्युअर्समधील डी एस कुलकर्णी यांचा पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे.

तर एफवायबीकॉम अभ्यासक्रमाच्या मराठी विषयातील ‘यशोगाथा’ या पुस्तकातील डॉ. प्र.चि.शेजवलकर यांचा लेख क्र.११ वास्तूउद्योगातील अग्रणी हा पाठ  वगळण्यात आला आहे.