टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार उडून दुस-या लेनवर; दुस-या टेम्पोखाली चिरडून मृत्यू

0
283

चाकण, दि. ९ (पीसीबी) – भरधाव वेगात टेम्पो चालवून अचानक टेम्पो वाळवताना एका दुचाकीला जोरात धडक बसल्याने दुचाकीस्वार उडून दुस-या लेनवर पडला. त्यानंतर दुस-या टेम्पोखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 8) सकाळी खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडला.

लक्ष्मण गोपाळ दळवी असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत बाजीराव हिरामण शेटे (वय 47, रा. सावरदरी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एम एच 14 / ई एम 7682) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र मयत लक्ष्मण दळवी एचपी चौकाकडून वासुलीकडे जात होते. सावरदरी येथे आल्यानंतर आरोपी टेम्पो चालकाने भरधाव वेगात, हयगयीने टेम्पो चालवून अचानक वळवला. त्यात दळवी यांच्या दुचाकीला टेम्पोची जोरात धडक बसली. यात दळवी वसुली – एचपी चौक या लेनवर उडून पडले.

दुस-या लेनवर पडल्यानंतर त्या लेनवरून जाणा-या एका टेम्पोखाली (के ए 52 / बी 1194) चिरडल्याने दळवी यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.