टिक-टॉक व्हिडिओच्या नादात तरुणाच्या दिशेने गोळीबार

0
550

पिंपरी, दि.५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये टिक-टॉक व्हिडिओ पाहत  उभा असलेल्या महाविद्यालयीन तरुणावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यात तो सुदैवाने बचावला आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन तरुणाने सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे.

रोशन सोळंकी आणि चैतन्य कदम असे गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास जुनी सांगवी येथील गंगोत्री निवास येथे फिर्यादी महाविद्यालयीन तरुण आणि त्याचा मित्र हे मोफत वाय-फायवर टिक-टॉक व्हिडिओ पाहत रस्त्यावर उभे होते. तेव्हा, रोशन आणि चैतन्य हे एकच दुचाकीवरून आले. फिर्यादी दिसल्यानंतर दुचाकी हळुवार घेत दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या रोशनने महाविद्यालयीन तरुणाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या, यात तो सुदैवाने बचावला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे. अद्याप आरोपी फरार असून त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.