ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

0
604

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून लेखिका विनता नंदा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अधिकृतरित्या हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

देश-विदेशात #MeToo कॅम्पेन अंतर्गत विविध क्षेत्रातील महिला कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक शोषणावर व्यक्त होत असताना विनता यांनी आपली आपबिती फेसबुकवर मांडली. तेव्हा हा प्रकार समोर आला. आता या प्रकरणी लेखिका विनता नंदा यांनी पोलिसात तक्रार दिल्याने आलोकनाथ यांच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ओशिवारा पोलिस अधिक तपास करत आहेत.