ज्यांना मोठं केलं, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती; खडसेंचा फडणवीसांना टोला

0
488

परळी,दि.१२(पीसीबी) – गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांच्याकडून आम्हाला छळाची अपेक्षा नव्हती,  असे म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. 

पाच वर्षात गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारु शकले नाहीत अशीही टीका खडसे यांनी केली. मुंडे अपघात विमा योजना सुरु करण्याचं काम मी केलं होतं असंही खडसे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे या वाघीण आहेत. आम्ही हजारोंच्या संख्येने त्यांच्यासोबत आहोत असंही खडसेंनी म्हटलं आहे.

मी विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष करावं म्हणून गोपीनाथ मुंडेंनी नेतृत्वाशी बोलले. मुंडे यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च होतं. मुंडे असते तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते असं बोललं जातं. पण ज्यांना मोठं केलं, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती  असे सांगत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर शरसंधान साधलं.