घोडखिंडीतला लढा आता मोठ्या पडद्यावर ‘जंगजौहर’

0
347

मुंबई, दि.१२ (पीसीबी) – कलाविश्वात आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. बाजीप्रभूंचा घोडखिंडीतला लढा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. फर्जंदआणि फत्तेशिकस्तया यशस्वी सिनेमांनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे मराठी चित्रपटातून आणखी एका अजोड पराक्रमाची गाथा घेऊन येत आहे. तो म्हणजे जंगजौहरहा मराठी चित्रपट. हा जून २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.