“वाढदिवसादिनी आईच्या आठवणीत शरद पवार भावूक”

0
348

मुंबई,दि.१२(पीसीबी) – आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी त्यांच्या आईंच्या आठवणींना उजाळा दिला.

१२ डिसेंबर याच दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो त्यामुळे माझ्या वाढदिवसापेक्षा आईचा वाढदिवस म्हणून हा दिवस लक्षात राहतो, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा जन्म दिवस आहे ते लक्षात राहतं. माझ्या आईने अनेक कष्ट केले. शेतात काम करायची, जे पिक येईल ते बाजारात पोहचविण्याचं काम करायची. सामाजिक कामाची तिला आवड होती, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.