जीएसटी चुकवल्याप्रकरणी पहिली कारवाई; पुण्यातील व्यापाऱ्याला मुंबईतून अटक

0
758

पुणे, दि. २८ (पीसीबी) – जीएसटी चुकवल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जीएसटी कायद्याअंतर्गत ही पहिलीच अटक आहे. या व्यक्तीने तब्बल ७९ कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचा आरोप आहे.

मोदसिंह पद्मसिंह सोढा असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी चुकवल्याप्रकरणी पुण्यातील मोदसिंह सोढा नावाच्या व्यक्तीला २६ ऑक्टोबरला मुंबईतून अटक करण्यात आली. ७९ कोटींचा जीएसटी चुकवल्याप्रकरणी या व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोढडी सुनावण्यात आली आहे. मोदसिंह सोढा हा १० बनावट कंपन्या चालवत होता. या कंपन्यांच्या आधारे त्याने ४१५ कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या होत्या. या किमतीचे कोणत्याही सामानाचा व्यवहार करण्यात आला नव्हता. सर्व व्यवहार फक्त कागदोपत्रीच करण्यात आला होता. यात त्याने जवळपास ८० कोटींचा जीएसटी चुकवला होता.