सेल्फी घेताना तरुण सिंहगडवरुन दरीत कोसळला

0
656

पुणे, दि. २८ (पीसीबी) – सिंहगड किल्ल्यावरील बारुदखान्याच्या तटबंदीवर सेल्फी काढताना एक तरुण दरीत कोसळला. मात्र, सुदैवाने तो झाडाला अडकल्याने त्याचे प्राण वाचले. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास घडली.

तुषार प्रकाश दळवी असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास तुषार आपल्या मित्र-मैत्रिणींसह सिंहगडावर फिरायला गेला होता. त्यावेळी किल्ल्याच्या बारुदखान्यावरील तटबंदीवर चढून तो सेल्फी काढत होता. मात्र, सेल्फी काढताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळला. त्या दरीच्या उतरणीवरील झाडावर अडकल्यामुळे त्याचे थोडक्यात प्राण वाचले. सुरक्षा रक्षकांनी त्याला जखमी अवस्थेतच दरीतून बाहेर काढले आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.