जायकवाडी धरण भागवणार नांदेडपर्यंतच्या लोकांची तहान

0
369

औरंगाबाद, दि. २६ (पीसीबी) – मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळाची स्थिती गंभीर होत चालली आहे. या दुष्काळग्रस्त भागाची तहान आता एकटे जायकवाडी धरण भागवणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणातून सध्या माजलगाव धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यानंतर विष्णुपुरीमध्येदेखील पाणी सोडण्याची मागणी होत आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ३० दलघमी पाणी सोडण्याची मागणी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. सध्या सर्व बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येत असून बुधवारपर्यंत विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडीचे हे पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण ते विष्णुपुरी प्रकल्पाचे अंतर ३३० किमी आहे.

पावसाअभावी जायकवाडी वगळता या विभागात धरणे कोरडी आहेत. त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि नांदेडसाठी जायकवाडी तारणहार ठरणार आहे