सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला धक्का; आ. दिलीप सोपल करणार २८ ऑगस्टला सेनेत प्रवेश

0
468

सोलापूर, दि. २६ (पीसीबी) – दिलीप सोपल राष्ट्रावादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवासापासून सोलापूर जिल्ह्यात रंगत आहेत. मात्रा आता सोपल यांच्या पक्षप्रवेशाची तारीख फायनल झाली आहे. २८ ऑगस्टला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थीत मोतोश्रीवर शिवसनेत प्रवेश करणार आहेत. अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप सोपल यांना ओळखले जाते. आघाडी सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रीपदांवर काम केले आहे. गेल्या महिनाभरापासून सोपल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर तीनवेळा मुहूर्त टळल्यानंतर आता त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोपल राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याने सोलापूर जिल्ह्यात पक्षाला धक्का मानला जात आहे.

आ. सोपल यांचा शिवसेना प्रवेश भाजपमध्ये असणारे माजी आ राजेंद्र राऊत यांच्यासाठी अडचणींचा ठरणार आहे. युतीच्या जागावाटपात बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, यामध्ये राऊत यांनी दोनवेळा शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला असल्याने पक्षप्रमुख त्यांच्यावर नाराज आहेत. सोपल यांच्या प्रवेशामुळे राऊत यांचा वचपा काढण्याची आयती संधी शिवसेनेला मिळणार आहे.