इंदापूरच्या जागेबाबत पक्ष घेईल, तो निर्णय मान्य – आमदार दत्तात्रय भरणे    

0
347

पुणे, दि. २६ (पीसीबी) – आपण पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते  आहोत. पक्ष घेईल तो निर्णय मान्य  आहे, असे स्पष्ट करून इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आगामी विधानसभेसाठी उमेदवारीचा चेंडू पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात टोलविला.   

इंदापूर विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दावा केला आहे. तर विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने ही जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाही. त्यामुळे या जागेसाठी    रस्सीखेच सुरू झाली आहे.  या पार्श्वभूमीवर आमदार  भरणे यांनी  पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.   त्यामुळे  शरद पवार उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, लोकसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून सुप्रिया सुळे यांना मदत केली.  मात्र, इंदापूरच्या जागेवर राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाम राहिले आहेत. त्यामुळे  या जागेचा  तिढा निर्माण झाला आहे. आता शरद पवार यातून कोणता मार्ग काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.