जेलमधून पळालेल्या दोन आरोपींना अटक

0
713

अहमदनगर, दि, २१ (पीसीबी) – संगमनेर येथील कोठडीचे गज कापून पळालेल्या दोन आरोपींना काही तासांतच पकडण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी पहाटे तुरुंगाच्या खिडकीचे गज कापून आरोपींनी पलयान केले होते. 

संगमनेर येथील कोठडीत विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा. मंचर ता. आंबेगाव) आणि कलीम अकबर पठाण (वय२०,रा. संगमनेर) यांना अटक करुन ठेवण्यात आले होते, शुक्रवारी पहाटे त्यांनी तुरुंगाचे गज कापून पलायन केले. आरोपी पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळातच आरोपी संगमनेरजवळच अकोले नाका येथे पकडले गेले. यातील विशाल तांदळे यापूर्वी राजगुरूनगर पोलिसांच्या कोठडीतून खिडकीचे गज कापून पलायन केले होते.